'महापारेषण'अंतर्गत मेगाभरती सुरू; अर्ज करण्याकरिता जाणून घ्या शैक्षणिक पात्रता, अंतिम मुदत

01 Dec 2023 15:44:14
Mahapareshan Recruitment 2023

मुंबई :
महापारेषण अंतर्गत मेगाभरती केली जाणार असून तरुणांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमधील विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

वाचा सविस्तर >> कोकण रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरु, 'या' शाखेतील पदवीधर उमेदवार करु शकतात अर्ज
 
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ १, तंत्रज्ञ २ पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. या पदाकरिता महापारेषण कंपनीत होणाऱ्या पदभरतीकरिता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ५०० रुपये तर राखीव प्रवर्गातील अर्जदारांकडून २५० रुपये अर्जशुल्क आकारण्यात येणार आहे.

महापारेषण अंतर्गत वरील रिक्त पदांच्या एकूण २५४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज २० नोव्हेंबर २०२३ पासून अर्जस्वीकृतीस सुरूवात झाली असून शेवटची तारीख १० डिसेंबर २०२३ असणार आहे. महापारेषणद्वारे करण्यात येणाऱ्या भरतीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Powered By Sangraha 9.0