अंगावर केसेस होते म्हणून गेलो नाही, तर....अजितदादांची चिंतन शिबीरात स्पष्ट भूमिका

01 Dec 2023 18:29:27
Karjat NCP Vichar Shibir

मुंबई :
कर्जत येथील विचार शिबीरातून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. अजित पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना अनेक नवे गौप्यस्फोट केले असून ते म्हणाले, “काही आमच्यावर आरोप करतात की यांच्यावर केसेस होत्या त्या थांबाव्यात म्हणून हे गेले. आमच्यापैकी काहींनी १९९९ पासून बहुतेक मंत्रीमंडळांत काम केलं आहे.

दरम्यान, ज्यांच्यासोबत अनेक गेली दोन दशकं सरकारात सहभागी होतो. त्यामुळे आमच्यावर आरोप झाले. पण आरोप झाले म्हणजे ते सिद्धही व्हायला पाहिजे. माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे जलसंपदा विकासकामांची गती रेंगाळली. त्याचबरोबर निधी मान्यता दिली म्हणूनदेखील माझ्यावर आरोप करण्यात आले असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
 
दरम्यान, कर्जत येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विचार शिबीर दि. १ डिंसेबर रोजी झाले. निर्धार नवपर्वाचा,वैचारिक मंथन घडयाळ तेच वेळ नवी, हे ह्या शिबिराचे घोषवाक्य आहे. ह्या विचार शिबीरात अजित पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ज्यामुळे विरोधकांना पळताभूई थोडी झाली आहे.

Powered By Sangraha 9.0