शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही : अजित पवार

01 Dec 2023 18:47:47
Karjat NCP Press Conference Ajit Pawar

मुंबई :
कर्जत येथील विचार शिबीरातून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. अजित पवारांनी पत्रकार परिषदेत बोलताना अनेक नवे गौप्यस्फोट केले. तसेच, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही, असेदेखील अजित पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामीत्व हा आपल्या पक्षाचा आत्मा आहे. त्यामुळे काही जण म्हणतात की, तुम्ही त्यांच्यासोबत कसे गेलात. मुळात जर आमच्या वरिष्ठांनी सांगितले तर शिवसेनेसोबत जाऊ शकतो मग ह्यांच्यासोबत का नाही? असा सवाल ही पवारांनी यावेळी उपस्थित केला.
 
तसेच आज काही पक्ष स्वता: ला सेक्यूलर आणि दुसऱ्यांना जातीवादी समजतात. स्वता: ला सेक्यूलर समजून घेणारे पक्ष आज इंडिया आघाडी म्हणून एकत्र येऊन भाजप आणि मित्र पक्षांवर टिका करतात. पंरतु देशातील महत्त्वाच्या पक्षांनी कधीना कधी भाजपासोबत युती केलेली आहे. मग त्यांनी विचारधारा सोडली नाही. पण आम्ही सोडली असं कसं म्हणता, असा घणाघात अजित पवारांनी विरोधकांवर केला.

Powered By Sangraha 9.0