पाटणा: बिहारमध्ये बेकायदेशीर मशिदी आणि मदरशांचा पूर आला आहे. बिहार बांगलादेश आणि नेपाळच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे या सीमांवर बेकायदा मशिदी आणि मदरशांची संख्या अधिक आहे. असे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गिरीराज सिंह यांनी सोशल मीडिया X वर एक व्हिडिओ जारी केला. त्याद्वारे त्यांनी नितीश कुमार यांना खडेबोल सुनावले आहेत.
गिरीराज सिंह म्हणाले की, "बिहार सरकारने बेकायदेशीर मदरशांवर तात्काळ बंदी घालावी. बिहारच्या सीमावर्ती भागातील परिस्थिती आणखी वाईट आहे आणि त्यामुळे बिहारच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. झाले आहे. इतकेच नाही तर तेथे PFI देखील सक्रिय आहे. बिहारमध्ये १८ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. बेकायदेशीर मशिदी आणि मदरशांवर बंदी घाला, नितीश कुमार मतांची लालसा पुरेशी करा, आता बिहार आणि देशासमोरील धोक्यांचा विचार करा. याकडे लक्ष दिले नाही, तर लोकांची संपत्ती आणि धर्म दोन्ही धोक्यात येईल. ना धर्म वाचणार आहे, ना पैसा वाचणार आहे." असं ते म्हणाले.
बिहारमध्ये जवळपास ३००० मदरसे आहेत, या सर्वाच्या चौकशीची मागणी गिरीराज सिंह यांनी नितीश सरकारकडे केली आहे. धार्मिक ब्रेनवॉशिंगऐवजी प्रगतीशील शिक्षण दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. बेकायदेशीर मदरसे बंद करण्याची मागणी करण्यासोबतच गिरीराज सिंह यांनी कायदेशीर मदरशांमध्ये विज्ञानाचे शिक्षण सुरू करण्याची मागणीही सरकारकडे केली आहे.