यावर्षीच्या वसुबारसचा मुहूर्त केव्हा?

    09-Nov-2023
Total Views |

vasubaras 
 
मुंबई : यंदा गुरुवार ९ नोव्हेंबरला वसुबारस साजरा केला जाईल. आश्विन वद्य द्वादशी अर्था‌त वसुबारस म्हणजे दिवाळीची सुरुवात. त्यामुळे शहरात सर्वत्र दरवर्षी दिवाळीचा पहिला दिवस गाय वासराच्या पूजनाने साजरा केला जातो. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही संबोधले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला असलेले महत्त्व लक्षात घेऊन आजही हा दिवस पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो. या दिवशी तिन्हीसांजेला गायीला ओवाळून, तिला चारा घालून करंजीचा नैवेद्य दाखवून गायीची वासरासह पूजा केली जाते. शहरात ज्यांच्या घरी गाई आहेत तसेच गोठ्यांमध्ये ज्या ठिकाणी गाय वासरु आहेत त्या ठिकाणी ही पूजा करण्यासाठी गर्दी असते.
 
वसुबारस सणाचा मुहूर्त नक्की केव्हा?
आपल्या बछड्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी या दिवशी त्यांना दूध म्हणजेच आपले जीवन देऊन जगवणाऱ्या गायीची पूजा केली जाते. यावर्षी वसुबारस ९ तारखेला सकाळी १०.४१ पासून सुरु होऊन दुसऱ्या दिवशी १० तारखेस दुपारी १२.३५ पर्यंत सुरु असेल.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.