रोहित शेट्टीच्या 'सिंघम ३' मध्ये बॉलिवूडच्या कलाकारांची जत्रा

09 Nov 2023 15:20:52

singham 3 
 
मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टी याने 'सिंघम' चित्रपटातून हिंदीतील कॉप युनिवर्स तयार केले. सिंघम चित्रपटांच्या पहिल्या २ यशस्वी भागांनंतर आता 'सिंघम ३' प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी येत आहे. महत्वाची बाब म्हणजे या कॉप युनिवर्समध्ये अभिनेत्री दीपिका पडूकोण हिचे पदार्पण झाले असून यात ती महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका बजावणार आहे.
 
अभिनेता अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पडूकोण यांच्या पाठोपाठ करिना कपूर देखील सिंघम ३ मध्ये वेगळ्याच भूमिकेत दिसणार असे दिसून येत आहे. त्याचे कारण असे की करिनाने समाज माध्यमावर एक पोस्ट शेअर करत असे लिहिले आहे की, "सैन्यात सामील होण्याची आता पुन्हा वेळ आली आहे". त्यामुळे याआधीच्या सिंघम चित्रपटाच्या भागात करिना अजय देवगणची प्रेयसी दाखवली होती. पण यात ती देखील पोलिस असणार किंवा अंडर कव्हर एजंट असणार का अशी चर्चा एकूणच रंगली आहे. 
 
रोहित शेट्टीच्या 'सिंघम' चित्रपटांच्या श्रृंखलेत 'सिंघम ३' देखील बाजी मारणार का हे पाहणे महत्वाचे असून यात हिंदीतील अनेक दिग्ग्ज कलाकारांची मांदियाळी पाहण्यास देखील प्रेक्षक आतुर आहेत. यात चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंग, दीपिका पडूकोण, अक्षय कुमार, करिना कपूर अशी तगडी फौज दिसणार आहे.
Powered By Sangraha 9.0