'CBI चे स्वागत आहे..या माझे जोडे मोजा' ; महुआंच वादग्रस्त विधान!

09 Nov 2023 16:10:24
Mahua Moitra on CBI

नवी दिल्ली : संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रांविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचा दावा भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला. 'या माहितीमुळए मला आनंद झाला की मोदीजींचा लोकपाल अस्तित्वात आहे, आधी सीबीआयला एफआयआर दाखल करावी लागेल, त्यानंतर सीबीआयचे स्वागत आहे, या माझे जोडे मोजा, असे मोइत्रा म्हणाल्या.

दरम्यान लोकसभेच्या आचार समितीने तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खासदार महूआ मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोप आहे.

महूआ मोईत्रांविरुद्ध चौकशी करणाऱ्या समितीने ५०० पानी अहवाल सादर केला आहे. तसेच त्यांचे हे कृत्य गुन्हेगारी स्वरुपाचे, संशयास्पद आणि अनैतिक असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, असे या समितीने म्हटले आहे. तसेच निर्धारित वेळेत त्यांची चौकशी करण्याची शिफारसही समितीकडून करण्यात आली आहे.
 
महुआ मोईत्रांनी आपला संसदेतील यूझर आयडी दुसऱ्या व्यक्तीला दिल्याचेही या समितीकडून सांगण्यात येत आहे. तसेच त्यांनी दर्शन हिरानंदानी या व्यावसायिकाकडून महागड्या वस्तू आणि पैसे घेणे, हा गंभीर गैरव्यवहार असल्याचे नमूद केले आहे. हा अहवाल संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यापुढे सादर केला जाणार आहे. यानंतर ते महुआ मोईत्रा यांच्यावरील कारवाईबाबतचा निर्णय घेणार आहे.





Powered By Sangraha 9.0