खारकोपर ते उरण दरम्यान लवकरच लोकल धावणार!

09 Nov 2023 12:42:14

Kharkopar Uran Local 
 
 
मुंबई : खारकोपर ते उरण दरम्यान लवकरच लोकल धावणार आहे. यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. तब्बल आठ महिन्यांनंतर मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हा मार्ग सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर आता रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. यानंतर आता लोकल ट्रेनच्या ४०फेऱ्या या स्थानकांदरम्यान धावणार आहेत.
 
नेरूळ आणि बेलापूरपासून खारकोपरपर्यंत दिवसाला २०लोकल फेऱ्या सुरू आहेत. यातील काही लोकल उरण पर्यंत चालवण्यात येतील. तर काही नवीन लोकल फेऱ्या चालवल्या जातील. यामुळे नवी मुंबई विमानतळ, उरण या पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना लोकलने हार्बर मार्गावर येता येणार आहे.
 
मागील जवळपास २५वर्षांपासून बहुप्रतिक्षित असलेल्या नेरुळ ते उरण लोकल मार्गावरील उरण खारकोपर दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले होते. त्यामुळे मार्गावरील लोकल धावण्याची प्रतीक्षा आहे. उरण ते खारकोपर या मार्गावरील अपूर्ण असलेल्या रेल्वेच्या कामानाही वेग आला आहे. आता, रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर लवकरच प्रवाशांच्या सेवेत लोकल रुजू होईल अशी अपेक्षा आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0