महादेव बेटिंग ॲप प्रकरण! मुंबई पोलिसांत ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

09 Nov 2023 14:40:22

Mahadev App


मुंबई :
महादेव बेटिंग ॲप प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत असून आता याप्रकरणी नवीन माहिती पुढे आली आहे. मुंबई पोलिसांनी महादेव बेटिंग ॲप प्रकरणी ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यासंबंधीचा पुढील तपास अजून सुरु आहे.
 
माटुंगा पोलिसांनी महादेव बेटिंग ॲप प्रकरणी १५ हजार कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ३२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ॲप प्रवर्तक सौरभ चंद्राकर, मुख्य आरोपी रवी उप्पल, शुभम सोनी यांचाही समावेश आहे.
 
मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. महादेव ॲप हे एक सट्टेबाजी ॲप असून ते २०१९ मध्ये सुरु करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी २०१९ पासून महादेव ॲपच्या माध्यमातून सुमारे १५ हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
 
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना महादेव ॲप प्रवर्तकांकडून कडून ५०८ कोटी रुपये देण्यात आल्याचीही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, ईडीने केलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने महादेव ॲपसह २२ बेकायदा ॲप्सवर बंदी आणण्याचे आदेश दिले आहेत.


Powered By Sangraha 9.0