काश्मीरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण ही नौटंकी; राऊतांचा जळफळाट

08 Nov 2023 11:49:10
 
Raut
 
 
मुंबई : जम्मू काश्मीरला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचे नौटंकी करता आणि इकडे ठाणे, मुंब्र्यात बाळासाहेब ठाकरेंची तसबीर असलेल्या शिवसेनेच्या शाखांवर बुलडोझर फिरवता? शिवसेनेच्या आयत्या शाखा ताब्यात घेणे, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा जय करणे ही विकृती आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंब्रा येथील शिवसेना शाखेवर बुलडोझर फिरवल्यावरून ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
 
संजय राऊत म्हणाले, "हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. ज्यांनी पाप केलं त्यांचा हिशोब होईल. हे पाप करणारे स्वतःला बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक समजतात. हा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. हे कसले शिवसैनिक? हा तर कलंक आहे. ११ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंब्रा शाखेला भेट देत आहेत. तुमच्या बुलडोझरपेक्षा स्वाभिमानी मनगटातील बळ महत्त्वाचे. हिशोब होईल. महाराष्ट्रात मोगलाई सुरू आहे. शाखा तोडत आहेत. हिंमत असेल तर आमच्या समोर याा." असं राऊत म्हणाले आहेत.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0