मुंबई : नगर येथे रोजगार मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून येथील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, नगर येथील रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. ०२ आणि ०३ डिसेंबर २०२३ दरम्यान असणार आहे.
या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पंडित दिनदयाल उपाध्याय ऑफलाइन जॉब फेअर नगर येथे विविध रिक्त पदांसाठी आयोजित करण्यात आला आहे. ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह, फूड प्रोडक्शन, पिकर आणि पॅकर, फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, फिटर/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, मशिनिस्ट, टर्नर आणि फिटर पदांसाठी ५३५ रिक्त जागा आहेत.
दरम्यान, नगर येथे आयोजित महारोजगार मेळावा विविध जिल्ह्यांसाठी असून रोजगार मेळावा संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://rojgar.mahaswayam.gov.in भेट द्या.