भारतातील पेटंट अर्जांमध्ये वाढ, पंतप्रधान मोदींकडून दखल

08 Nov 2023 17:29:13
India Patent Applications Hikes

नवी दिल्ली :
भारतातील पेटंट अर्जांमध्ये वाढ दिसून आली आहे. याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान, भारतातील पेटंट अर्जांमध्ये वाढीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट केली आहे. तसेच, २०२२ मध्ये निवासी भारतीयांच्या पेटंट अर्जांमध्ये ३१.६% वाढ झाली आहे.


दरम्यान, ११ वर्षांच्या वाढीचा विस्तार पाहता इतर कोणत्याही देशाने टॉप १० फाइल्समध्ये केला नाही. भारतातील पेटंट अर्जांमध्ये झालेली वाढ ही आपल्या तरुणाईचा वाढता नवोन्मेषी उत्साह दर्शवते आणि येणाऱ्या काळासाठी हे अतिशय सकारात्मक चिन्ह आहे, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0