लोकलमध्ये दिव्यांगाच्या डब्यात प्रवाशावर ब्लेडने हल्ला

07 Nov 2023 22:03:12
Thane Crime News


ठाणे
: ठाणे ते कळवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकल डब्यामध्ये एका तरूणावर धारदार ब्लेडने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जखमी तरुणाच्या तक्रारीवरून सोमवारी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

मुंब्रा येथे राहणारा १८ वर्षीय तरूण कल्याण धिम्या लोकलने शनिवारी रात्री दिव्यांगांच्या डब्यामधून प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्याशी एका व्यक्तीने किरकोळ कारणावरून वाद घातला. ठाणे आणि कळवा स्थानका दरम्यान लोकल आली असता, त्या व्यक्तीने हातातील ब्लेडने तरूणाच्या नाक आणि डोळ्याजवळ हल्ला केला. तरूण मुंब्रा रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले.

Powered By Sangraha 9.0