'जीएसटी' कर संकलन सुसाट! सरकारला होणार 'इतक्या' लाख कोटींचा फायदा

07 Nov 2023 12:30:12
GST 
 
नवी दिल्ली : पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात देशाचा नवीन अर्थसंकल्प मांडला जाईल. त्यासाठी केंद्र सरकार तयारीला लागले आहे. पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पची पूर्वतयारी म्हणून सरकारने काही प्राथमिक अहवाल तयार केले आहेत. या अहवालातून सरकारच्या करसंकलनात अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा जास्त वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. त्यासोबतच कर संकलन असच वाढत राहण्याचा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आला आहे.
 
२०२४-२५ या आर्थिक वर्षात जीएसटी संकलनाच्या वाढीचा वेग आहे अंदाजे १४ टक्के असू शकतो. तर सरासरी मासिक जीएसटी संकलन हे १.७ लाख कोटी ते १.८ लाख कोटी रुपये इतके असू शकते. चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन १.७२ लाख कोटी रुपये इतके होते. तर या आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यात सर्वाधिक जीएसटी संकलन झाले होते. एप्रिल महिन्यामध्ये १.८७ लाख कोटी इतके विक्रमी जीएसटी संकलन झाले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0