मोठी कारवाई! विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे निलंबन

06 Nov 2023 15:59:24
sri-lanka-cricket-board-suspended-by-sports-minister

मुंबई :
विश्वचषक २०२३ अंतर्गत श्रीलंकेची कामगिरी अतिशय सुमार अशीच राहिली. श्रीलंका क्रिकेट बोर्डावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, संघाच्या खराब कामगिरीचा परिणाम संपूर्ण बोर्डावर होतो असे क्वचितच घडते. आणि असाच काहीसा प्रकार श्रीलंकेत घडला आहे. वर्ल्डकपमधील लाजिरवाण्या कामगिरीमुळे श्रीलंकन संघावर निलंबनाची नामुष्की ओढावली आहे.

दरम्यान, विश्वचषकात संघाच्या खराब कामगिरीनंतर तेथील क्रीडा मंत्रालयाने क्रिकेट बोर्डावर मोठी कारवाई करत निलंबित केले आहे. अर्जुन रणतुंगा यांच्या अध्यक्षतेखाली एक अंतरिम समितीही स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान, श्रीलंकेचे क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला निलंबित केले आहे.

यासंदर्भात श्रीलंकेने एक समिती नेमली असून या समितीचे अध्यक्ष अर्जुन रणतुंगा यांना करण्यात आले आहे. यात तेथील सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एस. आय. इमाम यांचाही समावेश या समितीत करण्यात आला आहे. विश्वचषकात आतापर्यंत श्रीलंकन संघाने केवळ २ सामने जिंकले आहेत. त्यानंतर, सरकारने ही कारवाई केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भारताविरुध्द संघाला फक्त ५५ धावाच करता आल्या होत्या.

Powered By Sangraha 9.0