दिग्दर्शक नागराज मंजुळे बनवणार 'मटका किंग'वर वेब मालिका

06 Nov 2023 15:42:03

nagraj 
 
मुंबई : ‘सैराट’ सारखा सुपरहिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला देणारे दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. विविध विषयांना आणि प्रामुख्याने गावाची नाळ ही प्रत्येक चित्रपटातून जपणाऱ्या नागराज मंजुळे यांचा ‘नाळ २’ चित्रपट १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. एकीकडे मराठीत आपले स्थान बळकट करणाऱ्या मंजुळेंनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड चित्रपट करत हिंदीत देखील दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवले. आता पुन्हा एकदा हिंदीत नवी कलाकृती आणण्याच्या तयारीत नागराज मंजुळे आहेत अशी माहिती समोर येत आहे.
 

naal 2 
 
लल्लनटापला दिलेल्या मुलाखतीत नागराज मंजुळे यांनी त्यांच्या आगामी कलाकृतींबदद्ल माहिती दिली. नागराज आता लवकरच मटका किंगवर अर्थातरतन खत्री यांच्या जीवनावर आधारित वेब मालिका भेटीला आणणार आहेत. निर्माता सिद्धार्थ रॉय कपूप यांच्यासोबत ते वेब मालिका करणार असल्याचे सांगितले जात आहे. ६० ते ९० च्या दशकात भारतातील जुगाराचे संस्थापक आणि 'मटका किंग' म्हणून ओळखले जाणारे रतन खत्री यांच्या जीवनातील घटनांवर कथानक आधारित असणार आहे.
Powered By Sangraha 9.0