आशा स्‍कूल्‍सच्‍या विकासाकरिता रेलिगेअर एंटरप्राइजेसचा पुढाकार

06 Nov 2023 11:22:37

Religare
 
आशा स्‍कूल्‍सच्‍या विकासाकरिता रेलिगेअर एंटरप्राइजेसचा पुढाकार
 
मुंबई : रेलिगेअर एंटरप्राइजेस लिमिटेड (आरईएल) आणि आर्मी वाइव्‍ह्ज वेल्‍फेअर असोसिएशन (एडब्‍ल्‍यूडब्‍ल्यूए) यांनी आज नवी दिल्‍लीमधील व इतरत्र असलेल्‍या आशा स्‍कूल्‍सच्‍या आधुनिकीकरण व सर्वांगीण विकासाच्‍या माध्‍यमातून विशेष-विकलांग मुलांच्‍या आरोग्‍याप्रती त्‍यांच्‍या दीर्घकालीन कटिबद्धतेची घोषणा केली. विशेष-विकलांग मुलांच्‍या क्षमतांना निपुण करण्‍यासाठी एडब्‍ल्‍यूडब्‍ल्यूएद्वारे देशभरात ३२ आशा स्‍कूल्‍सचे कार्यसंचालन पाहिले जाते. आशा स्‍कूल्‍स भारतातील विविध शहरांमधील जवळपास १२०० मुलांचे पालनपोषण करत आहेत, ज्‍यामध्‍ये सेवा कर्मचारी व सशस्‍त्र दलातील दिग्‍गजांच्‍या ५०० मुलांचा आणि नागरी पार्श्‍वभूमीमधील ५०० मुलांचा समावेश आहे. याव्‍यतिरिक्‍त, रेलिगेयरने घोषणा केली आहे की कंपनी आग्रा, हिस्‍सार,मथुरा, जालंधर व गुवाहाटी येथील ५ अतिरिक्‍त स्‍कूल्‍सना पाठबळ पुरवणार आहे.
 
डिसेंबर २०२२ व एप्रिल २०२३ मध्‍ये आरईएल व एडब्‍ल्‍यूडब्‍ल्‍यए यांच्‍यात सुरू झालेल्‍या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आरईएलने नवी दिल्‍ली, पुणे, बेंगळुरू,लखनौ, सिकंदराबाद व उधमपूर येथील आशा स्‍कूल्‍सचे अपग्रेडेशन व आधुनिकीकरणासाठी सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली. एक वर्षाच्‍या आत आरईएलने आशा स्‍कूल, दिल्‍लीसाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांमध्‍ये सुधारणा केल्‍या आहेत, ज्‍यामुळे शाळेला नवीन रूप मिळाले आहे. इतर शहरांमधील शाळांना अपग्रेड करण्‍यामध्‍ये देखील मोठ्या प्रमाणात ऑन-ग्राऊंड प्रगती करण्‍यात आली आहे.
 
रेलिगेअर एंटरप्राइजेस लिमिटेडच्‍या कार्यकारी अध्‍यक्षा डॉ. रश्‍मी सलुजा म्‍हणाल्‍या, " आम्‍हाला आशा स्‍कूल्‍सच्‍या विकासाला पाठिंबा देण्‍यास सक्षम असण्‍याचा आनंद होत आहे. रेलिगेअरमध्‍ये आमचा सेवा देत असलेल्‍या समुदायांमध्‍ये सकारात्‍मक परिणाम निर्माण करण्‍यावर विश्‍वास आहे आणि आम्‍ही या उपक्रमाकडे विशेष-विकलांग मुलांना सक्षम करण्‍याच्‍या आशा स्‍कूल्‍सच्‍या प्रयत्‍नामध्‍ये योगदान देण्‍याची संधी म्‍हणून पाहतो. स्‍कूल्‍स मुलांना मार्गदर्शन करण्‍यासह निपुण करतात, ज्‍यामुळे ते स्‍वत:च्‍या संपूर्ण क्षमतांपर्यंत पोहोचण्‍यास सक्षम होतात. या मुलांचे शिक्षण व स्‍वास्‍थ्‍याला पाठिंबा देत आम्‍ही त्‍यांच्‍यासाठी व आपल्‍या समाजासाठी उज्‍ज्‍वल भवितव्‍य निर्माण करण्‍याची आशा करतो. पुढील वर्षापर्यंत सर्व आशा स्‍कूल्ससोबत भागिदारी करण्‍याचे आमचे ध्‍येय आहे. "
 
सहयोगाचा पहिला टप्‍पा यशस्‍वीरित्‍या पूर्ण झाल्‍यानंतर ही घोषणा करण्‍यात आली, जेथे पहिल्‍या टप्‍प्‍यामध्‍ये दिल्‍लीमधील आशा स्‍कूलचे आधुनिकीकरण करण्‍यात आले. दिल्‍लीमध्‍ये अंमलबजावणी करण्‍यात आलेल्‍या मॉड्यूल-आधारित दृष्टीकोनाचा पुन्‍हा अवलंब करत आरईएल अभ्‍यासक्रम विकास, पायाभूत सुविधा आणि इतर शाळांमधील शिक्षकवर्गाच्‍या क्षमता अशा विविध हस्‍तक्षेपांच्‍या माध्‍यमातून सर्वांगीण पाठिंबा देते. रेलिगेअरचा या शाळांमधील विद्यार्थ्‍यांना वैद्यकीय व पोषणासंदर्भातील गरजांची पूर्तता करण्‍यासह परिवहन सुविधा, व्‍यावसायिक मार्गदर्शन आणि प्लेसमेंट व इंटर्नशिप साह्य प्रदान करण्‍याचा मनसुबा आहे.
 
Powered By Sangraha 9.0