सुप्रिया सुळेंना दिवाळीपूर्वीच भाऊबीज! ताईंच्या मतदार संघात दादांचा सरपंच!

06 Nov 2023 13:16:58
 supriya sule
 
मुंबई : राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूकाचे निकाल लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीत महायुतीने आपले वर्चस्व राखले आाहे. तर काही भागात महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला आहे. यातीलच एक नाव आहे, सुप्रिया सुळे यांचं.
 
सुप्रिया सुळेंच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील गावांमध्ये अजित पवार यांच्या गटाने बाजी मारली आहे. बारामती मतदार संघातील गावांमध्ये अजित पवार गटाने एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यासोबतच राज्यपातळीवर सुद्धा अजित पवारांनी शरद पवारांना चांगलाच धक्का दिला आहे.
 
११२६ ग्रामपंचायतचा निकाल हाती लागला आहे, त्यामधील २१६ ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवून अजित पवार गट राज्यपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर भाजपने ३१९ ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळवली आहे. तर महायुतीचा तिसरा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने सुद्धा १५४ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाला अवघ्या ५६ ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला आहे. हा निकाल शरद पवारांसाठी आणि सुप्रिया सुळेंसाठी राजकीय दृष्ट्या धक्कादायक मानला जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0