रश्मिका मंदानाच्या त्या फेक व्हिडिओवर अमिताभ बच्चन यांची कायदेशीर कारवाईची मागणी

06 Nov 2023 14:59:04

rashmika and amitabh 
 
मुंबई : समाज माध्यमावर सध्या सामान्य लोकांपासून ते कलाकारांचे मॉर्फ फोटो, व्हिडिओ बनवण्याचं प्रमाण वाढत चालले आहे. नुकताच दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. यावरुन अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनीही या फेक व्हिडिओबाबत चिंता व्यक्त करत थेट कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
 
 
रश्मिकाच्या या फेक व्हिडिओमागचा खरा व्हिडिओ देखील आता पोस्ट करण्यात आला आहे. अमिताभ बच्चन यांनी तो खरा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. कोणत्ही व्यक्तीचे असे फोटो-व्हिडिओ मॉर्फ करुन व्हायरल करणे हा गुन्हा असून त्यावर लवकरात लवकर कारवाई केली जावी अशी मागणी सध्या जोर धरु लागली आहे. दरम्यान, रश्मिका मंदाना हिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुडबाय’ या चित्रपटात काम केले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0