मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डनवर विश्वचषक सामना खेळविण्यात येत आहे. या सामन्यात विराट कोहलीने आपल्या वनडे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतले ४९वे शतक ठोकले. विराटने आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना बर्थडे गिफ्ट दिले आहे.
दरम्यान, विराटने आफ्रिकेविरुध्द शतक ठोकत सचिन तेंडूलकरच्या सर्वाधिक वनडे शतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याने २८९ वनडे सामन्यात ४९ शतक आणि ७० अर्धशतकांसह नवा विक्रमाच्या उबंरठ्यावर पोहोचला आहे. दरम्यान, विराटला न्यूझीलंडविरुध्दच्या सामन्यात विक्रमाशी बरोबरी केली असती परंतु, त्या सामन्यात विराटला ९५ धावाच करता आल्या.