अमेरिकेत कट्टरपंथीयांचा 'व्हाईट हाऊस'ला घेराव; इस्रायलला मदत थांबवण्याची मागणी

05 Nov 2023 12:49:32
gaza 
 
वाशिंग्टन डी.सी : हमासने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत १४०० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून इस्रायलला समर्थन मिळाले. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने इस्रायलला आर्थिक मदत दिली. पण अमेरिकन सरकारने इस्रायला मदत देणे बंद करावे, अशी मागणी करत काही पॅलेस्टिनी समर्थकांनी व्हाईट हाऊसला घेराव घातला आहे.
 
गाझामध्ये तातडीने युद्धबंदी व्हावी, अशी या आंदोलकांची मागणी केली आहे. अमेरिकेने इस्रायलला दिलेली मदत थांबवण्याची मागणीही आंदोलक करत आहेत. या आंदोलकांनी व्हाईट हाऊसच्या भिंतीवर लाल रंगाच्या स्प्रेची फवारणी केली. त्यासोबतच इस्रायल आणि ज्यू धर्मांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
 
यावेळी आंदोलकांनी वाशिंग्टन डी.सी मधील महत्त्वाच्या रस्त्यांवर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे वाशिंग्टन डी.सी.मध्ये अराजकतेची परिस्थिती निर्माण झाली होती. यामधील काही आंदोलकांनी हमासच्या समर्थनात सुद्धा घोषणाबाजी केली.
 
 
Powered By Sangraha 9.0