किंग कोहलीचा ३५ वा वाढदिवस; हटके शुभेच्छांचा वर्षाव

05 Nov 2023 17:20:02
Indian Batter Virat Kohli 35th Birthday

 मुंबई :
भारताचा स्टार फलंदाज, क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत बनलेल्या विराट कोहलीचा वा वाढदिवस साजरा करत आहे. विराट कोहलीने आजवर अनेक विक्रम आपल्या नावावर केलेत, आता तो सचिनच्या वनडेतील सर्वाधिक शतकांशी बरोबरी करणार आहे. या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी त्याला अवघ्या एका शतकाची आवश्यकता आहे.


दरम्यान, विराट कोहली आपला ३५ वाढदिवस साजरा करत असून अगदी चाहत्यांपासून ते विविध स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. ओडिसाच्या पूरी समुद्रकिनाऱ्यावर वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी ३५ बॅट्स आणि ३५ बॉल्ससह विराट कोहलीचं सुबक वाळूशिल्प साकारत हटके शुभेच्छा दिल्या.


तसेच, भारताचा माजी सलामीवीर विरेंदर सेहवाग याने आपल्या नेहमीच्या हटके शैलीत ट्विट करत विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. विरेंदर सेहवागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, शतक त्याच्या नसानसांमध्ये हिमोग्लोबिनसारखे धावत असते. डोळ्यात स्वप्ने असलेल्या एका तरुणाने आपल्या कामाची नीतिमत्ता, आवड, मेहनत आणि प्रतिभेने या खेळावर राज्य केले आहे. चढ-उतार असतील पण जे स्थिर राहिले ते म्हणजे त्याची तीव्रता आणि भूक, अशा आशयाचं ट्विट करत सेहवागने विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0