नवी दिल्ली : हिंदूंना किड्यांसारखे चिरडले जाईल, आमचं सरकार आल्यावर सगळं साफ होईल असे वक्तव्य करणाऱ्या युवकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील हा व्हिडिओ असून अयान कुरेशी नावाच्या मुस्लीम युवकाने हे वक्तव्य केले आहे.
एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना त्याने हे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, "हिंदू काय आहे? हे हिंदू किड्यांसारखे चिरडले जातील. भारतात राहिल्यानंतर तुम्ही फक्त हिंदू हिंदू करत आहात. मला सांगा हिंदू कोणत्या देशात आहेत? बाबर आणि त्याच्या इतिहासाचे तुम्ही काय करत आहात. तुम्ही काहीही करू शकता, पण फक्त भारतापुरते मर्यादित आहात, असे त्याने म्हटले.
तसेच “तुम्ही प्रयागराजचे नाव हे ठेवले ते ठेवले असं करत आहात. तुमचं सरकार आहे तुम्ही काहीही करु शकता. पण ज्यादिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी सगळं काही पुसून टाकण्यात येईल असेही अयान कुरेशी म्हणाला. पुढे तो म्हणाला की, हिंदू माझं मटण शॉप आहे. पण वर्षातून सहा महिने माझं दुकान बंद ठेवण्यात येते. करवा चौथ आहे, हा सण आहे, तो सण आहे असं म्हणून मांस विक्रीवर बंदी घालण्यात येते,
तसेच योगी आदित्यनाथ सरकारने आजपर्यंत एकही चांगले काम केले नाही. राहूल गांधींमध्ये पंतप्रधान बनण्याच्या सगळ्या गोष्टी आहेत, असे तो म्हणाला. तसेच इस्लाम जिवंत होता, जिवंत आहे आणि जिवंत राहील, असे त्याने म्हटले. हा व्हिडिओ मसुरी पोलिस स्टेशन परिसरातील आहे. गाझियाबाद पोलिसांनी या व्हायरल व्हिडिओची दखल घेत व्हिडिओच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी अयान कुरेशीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येत आहे.