केदारनाथमध्ये उद्धव ठाकरेंसमोर घोषणाबाजी!

04 Nov 2023 13:16:30
 
Thackeray
 
 
मुंबई : केदारनाथमध्ये उद्धव ठाकरेंसमोर घोषणाबाजी करण्यात आली आहे. बद्रीनाथच्या दर्शनाला उद्धव ठाकरे गेले असताना तेथे शिवसैनिक देखील हजर होते. तर यावेळी बेळगावमधल्या सीमा भागातील काही लोकांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर घोषणाबाजी केली. 'बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!' "उद्धवसाहेब, आदित्यसाहेब तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत!" अशी घोषणाबाजी करण्यात आली.
 
यावेळी उपस्थित भाविकांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोटोशूट केले. ठाकरे कुटुंबीय उत्तराखंडच्या असताना जोरदार स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर देखील उपस्थित होते.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0