ड्रग्ज प्रकरणातील मोठी लढाई कारवाई सुरू!, गृहमंत्री फडणवीसांचं महत्वाचं वक्तव्यं

04 Nov 2023 14:27:44
 
Devendra Fadnavis
 
 
मुंबई : ड्रग्ज प्रकरणातील मोठी लढाई महाराष्ट्रात सुरू आहे. ललित पाटिलला कुणाचं समर्थन आहे हे सर्वांना माहिती आहे. ड्रग्जप्रकरणातील सहभागी पोलिसांना बडतर्फ करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटिल हा पोलिसांच्या ताब्यात आहे. यासंबंधी दररोज नवनवे खुलासे होत आहेत. याच पार्श्वभुमीवर फडणवीसांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "ड्रग्जच्या संबंधात गुंतलेल्या लोकांवर जेवढे कडक कायदे आहेत, ते सगळे लावण्यात येतील. आपण ड्रग्ज फ्री महाराष्ट्र अभियान सुरू केलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात छापे टाकले जात आहेत. अपराधी असणाऱ्यांवर तर कारवाई होईलच, जे पोलिस यामध्ये गुंतलेले असतील त्यांना फक्त सस्पेंड नाही तर ३११ प्रामाणे त्यांना डिसमीस केलं जाईल. कुठल्याही पुराव्याशिवाय केलेले आरोप हे त्यांना काही अर्थ नसतो. अनेक वेळा ते घुमून फिरून आपल्याकडेच येतात. त्यामुळे राजकीय नेत्यांनी असे आरोप करु नयेत." असे फडणवीस म्हणाले.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0