महानगर साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदी वीणा गवाणकर यांची निवड

30 Nov 2023 12:24:52

veena 
 
मुंबई : मुंबई मराठी साहित्य संघ आणि नॅशनल लायब्ररी वांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने ४६ वे महानगर मराठी साहित्य संमेलन शनिवारी दि. २ डिसेम्बर ओजी आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन वांद्रे पश्चिम येथील नॅशनल लायब्ररी सभागृहात दुसऱ्या मजलावरहोईल. या संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध लेखिका वीणा गवाणकर भूषवणार आहेत. तसेच अम्मेलनाचे उदघाटन संजय मोने यांच्या हस्ते सकाळी ठीक ९.३० वाजता होईल. आमदार ऍड. आशिष शेलार या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत
.
या संमेलनात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे तर कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ प्रदर्शनाच्या उदघाटनापासुन होणार आहे. त्यानंतर मान्यवरांचे सत्कार व अभिनेत्री चिन्मयी सुमित यांची प्रकट मुलाखत होणार आहे. 'आजची समाज माध्यमे - शाप की वरदान' या विषयावर परिसंवाद भोजनोत्तर सत्रात होईल. त्यानंतर निमंत्रित तरुणांचे कविसंमेलन होऊन सांगीतिक कार्यक्रमाने संमेलनाची सांगता होईल.
Powered By Sangraha 9.0