चीनची अर्थव्यवस्था खोल गर्तेत? 'या' निर्देशांकात झाली मोठी घसरण

30 Nov 2023 14:08:43
 China Economic recession
 
बिजिंग : जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनचे आर्थिक संकट कमी होण्याचे नाव घेत नाहीये. चीनमध्ये कारखाना क्रियाकलाप निर्देशांक नोव्हेंबरमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात घसरला आहे. चिनी उत्पादकांच्या अधिकृत सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.
 
चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अधिकृत उत्पादन खरेदी व्यवस्थापकांचा निर्देशांक नोव्हेंबरमध्ये ५० टक्के घसरला आहे. गेल्या आठ महिन्यांत हा निर्देशांक सात वेळा घसरला आहे. चीनच्या सरकारने कोरोना रोखण्यासाठी आमलात आणलेल्या झिरो कोव्हिड पॉलिसीमुळे आणि अमेरिकेसोबत चालू असलेल्या व्यापारयुद्धामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेत मंदी कायम आहे.
 
चीनच्या या आर्थिक मंदीचा परिणाम चीनच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा होत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. मागच्या काही दिवसांपासून चीनमध्ये नामांकित व्यावसायिक आणि सरकारमधील महत्वाचे मंत्री गायब झाले आहेत. त्याचबरोबर चीनमध्ये पुन्हा एकदा निमोनिया सदृश आजाराने आपले डोके वर काढले आहे. त्यामुळे सुद्धा जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0