मराठी उद्योजक व गिरगाव नगर संघचालक अतुल बेडेकर यांचे निधन

03 Nov 2023 16:48:44
V. P. Baedeker & Sons Group Director Atul Bedekar Passed Away

मुंबई :
मराठी उद्योग जगतात मसाले उत्पादन व विक्रीच्या व्यवसायात अग्रेसर असलेल्या 'व्ही. पी. बेडेकर अँड सन्स' समूहाचे संचालक अतुल वसंतराव बेडेकर (५६) यांचे शुक्रवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंजत होते. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मध्यरात्री १२.३० वाजता त्यांना देवाज्ञा झाली. अतुल बेडेकर हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, गिरगाव नगर संघचालक म्हणून त्यांच्याकडे सध्या जबाबदारी होती.

गिरगावात १९१० साली व्ही. पी. बेडेकर यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. १९४३ मध्ये बेडेकर मसाले व्यवसायाचे प्राइव्हेट लिमिटेड कंपनीत रूपांतर झाले. आज बेडेकर ब्रँड व ब्रँडची उत्पादने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील घराघरांत पोहोचली असून परदेशांतूनही या उत्पादनांना मोठी मागणी आहे.
Powered By Sangraha 9.0