मुंबई : मुंबईतील वडाळा परिसरात वृद्ध महिलेची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह घराबाहेर फेकल्याची घटना समोर आली आहे. खरं तर, एका महिलेच्या निर्घृण हत्येप्रकरणी २७ वर्षीय आरोपी मोहम्मद फैज रफिक सय्यद यांना अटक करण्यात आली आहे. दि. २ नोव्हेंबर रोजी मोहम्मदला अटक करण्यात आले असून तो वडाळा पूर्वेतील बीपीटी गेट क्रमांक ५ परिसरातील रहिवासी आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद फैजने एका ७५ वर्षीय महिलेच्या डोक्यावर स्टीलच्या रॉडने वार करून तिची हत्या केली. सुगरबी हुसेन मुल्ला असे महिलेचे नाव असून तिचा जागीच मृत्यू झाला. वृत्तानुसार, महिलेची हत्या केल्यानंतर आरोपींनी तिचा मृतदेह एका गोणीत भरला आणि तिचा मृतदेह घराच्या खिडकीतून फेकून दिला.एवढेच नाही तर आरोपींनी महिलेचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही तो पोलीसांच्या तावडीतून सुटू शकला नाही.