'या' महापालिकेंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या कसा कराल अर्ज

03 Nov 2023 17:57:59
Mira-Bhyander Municipality Recruitment 2023

मुंबई :
मीरा-भाईंदर महापालिकेंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती करण्यात येत आहे. मीरा-भाईंदर महापालिकेतील विविध रिक्त जागा भरण्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, महापालिकेतील विविध जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे मीरा-भाईंदर महापालिकेत नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
 
दरम्यान, मीरा भाईंदर महानगरपालिकेतील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि एमपीडब्ल्यू (पुरष) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार असून या भरतीसाठी ४५ पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तर या पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ०८ नोव्हेंबर २०२३ असणार आहे. या भरतीरकरिता पदानुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे.

वैद्यकीय अधिकारी (१५ जागा) – MBBS + MIC/ MMC रेजिस्ट्रेशन, परिचारिका(१५ जागा) – B.Sc (नर्सिंग) / GNM + MNC रेजिस्ट्रेशन, एमपीडब्ल्यू (१५ जागा)– १२ वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रैनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स असणार आहेत. सदर भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Powered By Sangraha 9.0