महाडमध्ये भीषण स्फोटात ४ जणांचा मृत्यू

03 Nov 2023 12:02:40
 mahad fire
 
रायगड : महाड एमआयडीसीतील ब्लू जेट हेल्थकेअर लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात चार कामगारांचा मृत्यू झाला. शुक्रवारी दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास घटना उघडकीस आली. गॅस गळतीमुळे हा स्फोट झाला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे.
 
या घटनेनंतर पोलिस आणि अग्निशमक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. अद्याप काही कामगार कंपनीत अडकल्याची भिती आहे. आग अद्याप नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे जखमीचा आणि मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यासोबतच ३ कामगारांना महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0