नवी दिल्ली : पाकिस्तानी कलाकारांवर भारतात संपूर्ण बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू देऊ नये, अशी याचिकेत विनंती करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी ऑक्टोबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यास प्रवृत्त करत याचिका फेटाळली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, "एवढी संकुचित वृत्ती बाळगु नये."
कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला, भारतीय नागरिकाला काम देण्यापासुन, कोणत्याही सेवेचा लाभ घेण्यापासुन किंवा कोणत्याही असोसिएशनमध्ये प्रवेश करण्यापासुन रोखण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश द्यावेत. अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. त्यात सिनेकर्मी, गायक, संगीतकार, गीतकार आणि तंत्रज्ञ यांचा समावेश होता.