ICMR-NIV Recruitment 2023 : 'या' पदांकरिता भरती सुरू, आजच अर्ज करा

29 Nov 2023 16:29:51
National Institute of Virology Recruitment 2023

मुंबई :
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. आयसीएमआर अंतर्गत होणाऱ्या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून याअंतर्गत टेक्निशियन असिस्टंट आणि टेक्निशियन-I पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.


आयसीएमआर अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी विभागातील टेक्निशियन असिस्टंट आणि टेक्निशियन-I पदाच्या एकूण ८० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्याचबरोबर, या भरतीकरिता उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख १० डिसेंबर २०२३ असणार आहे. दरम्यान, या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३०० रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार असून मागासवर्गीयांना शुल्कात सूट देण्यात आली आहे.
 
तसेच, टेक्निशियन-I पदासाठी १२ वी विज्ञान विषयासह ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण + संबंधित विषयात डिप्लोमा तर टेक्निशियन असिस्टंट या पदासाठी संबंधित विषयात प्रथम श्रेणी पदवी/ डिप्लोमा असणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे, या भरतीसाठी संगणकावर आधारित परीक्षा १६ ते १७ डिसेंबर २०२३ यादिवशी घेण्यात येणार आहे. आयसीएमआर-एनआयव्ही विभागातील भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.


 
Powered By Sangraha 9.0