पहिल्या तीन दिवसांत ‘झिम्मा २’ ची ४.७७ कोटींची कमाई

28 Nov 2023 11:46:27

jhimma 2 
 
मुंबई : प्रवासाचा मनमुराद आनंद घेणाऱ्या ७ अनोळखी महिला, एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी होतात आणि त्यांचा जीवनप्रवास सुरु होतो, हे दाखवणारा चित्रपट म्हणजे हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’. २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात तर घर केले आहेच पण बॉक्स ऑफिसवर देखील उत्कृष्ट कमाई केली आहे या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर कमाल कमाई केली आहे. ‘झिम्मा २’ ने ४.७७ कोटींचा गल्ला जमवला असून या आकड्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे.
 
चित्रपटाला मिळणाऱ्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ‘’प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम सुखावणारे आहे. आम्ही अनेक थिएटर्सना भेट देत आहोत खूप ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. चित्रपट पाहून प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिक्रिया भारावणाऱ्या आहेत. हा भाग आधीच्या भागापेक्षा अधिक चांगला असल्याच्याही प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक आवर्जून भेटायला येत असून सोशल मीडियावरही अनेकांचे संदेश येत आहेत. प्रेक्षकांकडून ‘झिम्मा २’वर होणारा कौतुकाचा वर्षाव भारी फिलिंग देणारा आहे.
 

jhimma  
 
कलर यल्लो प्रॅाडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज, चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0