सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बाल व्हेटिंलेटरवर

28 Nov 2023 11:26:43

rohit bal 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीचे सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बाल यांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित बाल यांना व्हेटिंलेटवर ठेवण्यात आले असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. अनेक चाहते रोहित बाल यांच्या या प्रकृतीनंतर चिंता व्यक्त करत असून त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.
 
 
 
रोहित यांना २०१० साली हृदयविकाराचा झटका आला होता. तसेच, इतर काही कारणांमुळे त्यांना व्यसन मूक्ती केंद्रातही दाखल करण्यात आले होते. भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सच्या यादीत अग्रस्थानी असलेले रोहित बल मूळचे काश्मीरचे. फॅशन जगतात रोहित बाल गेली तीन दशके सक्रिय आहेत.२००१ आणि २००४ साली इंटरनॅशन फॅशन अवॉर्ड आणि २००६ साली इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये ‘डिझायनर ऑफ द इयर’ म्हणून पुरस्कार देत त्यांना गौरवण्यात आले होते. तसेच, २०१२ साली रोहित यांची लॅक्मे फॅशन वीकमध्ये ग्रँड फिनाले डिझायनर म्हणून निवड करण्यात आली होती.
Powered By Sangraha 9.0