अभिनेत्री पुजा सावंत करतेय नव्या आयुष्याची सुरुवात, सोशल मिडियावरील पोस्टने वेधले लक्ष
28-Nov-2023
Total Views |
मुंबई : श्रावण क्वीन ते यशस्वी अभिनेत्री असा मोठा पल्ला गाठणारी अभिनेत्री पुजा सावंत हिने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. पुजा सावंत तिच्या चित्रपटातील विविधांगी भूमिकेसाठी तर चर्चेत असतेच परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही तितकीच चर्चा केली जाते. दरम्या, बऱ्याचदा पुजाचे नाव तिच्या सहकलाकारांशी जोडले गेले होते. आता मात्र, पुजाने तिच्या जीवनातील खऱ्या जोडीदाराबद्दल सर्वांना सांगितले आहे. इतकेच नव्हे तर पुजाने गुपचुप साखरपुडा देखील उरकून टाकला आहे.
पूजा सावंतने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून त्यात तिने तिच्या जोडीदाराचा चेहरा लपवत केवळ हातातील अंगठी दिसेल असा फोटो शेअर केला आहे. यात तिने We are engaged असे म्हटले आहे. “माझ्या आयुष्यातील एका नवीन अध्यायासाठी मी सज्ज झाले आहे. ही प्रेमाची जादू असून आम्ही आमचा सुंदर प्रवास सुरु करत आहोत. We are engaged”, अशी पोस्ट पूजाने केली आहे. त्यामुळे एकीकडे साखरपुडा गुपचुप उरकल्यानंतर आता नेमकी तिचा जोडीदार कोण आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
पुजा सावंत हिच्या आगामी चित्रपटाबदद्ल बोलायचे झाल्यास पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ चित्रपटात ती भूमिका साकारणार असून हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.