मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येत्या ३ डिसेंबर २०२३ रोजी ‘चैत्यभूमी’ या सोमनाथ वाघमारे दिग्दर्शित माहितीपट कोलंबिया यूनिव्हर्सिटीत दाखवला जाणार आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील इन्स्टिटयूट फॉर कॅम्पाराटीव्ह सोसायटी अँड लिटरेचर या विभागातर्फे हा माहितीपट दाखवला जाणार आहे.
‘चैत्यभूमी’ या माहितीपटाचे पहिले आंतरराष्टीय प्रदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेच्या मीडिया आणि कम्युनिकेशन विभागाकडून करण्यात आले होते. याव्यतिरिक्त २३ नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये देखील हा माहितीपट दाखवला गेला होता. 'चैत्यभूमी' या माहितीपटाचे दिग्दर्शन सोमनाथ वाघमारे यांनी केले असून तमिळ चित्रपट निर्माते पा. रंजित यांच्या नीलम प्रॉडक्शनने प्रस्तुत केले आहे.