मुलुंडचे मुंब्रा बनवण्याचे उद्धव ठाकरेंचे कारस्थान; सोमय्यांनी केला खुलासा

28 Nov 2023 11:43:58
 
Kirit Somaiya
 
 
मुंबई : मुलुंडचे मुंब्रा बनवण्याचे उद्धव ठाकरेंचे कारस्थान असल्याचा खुलासा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. ५०,००० लोकांचे बेकायदेशीररित्या स्थलांतर केले जाणार होते. त्यात अर्ध्याहून अधिक बांग्लादेशच्या मुळचे होते. फिरोज शेख, मोहम्मद सिद्धिकी, मोहम्मद युसुफ, हानिफ शेख, फैजुल हक, सय्यद ख्वाजा, सफी उल्लाह अशी नावे सोमय्यांनी सांगितली आहेत. आज संध्याकाळी ७ वाजता मुलुंड पूर्व येथे जनआंदोलनात किरीट सोमय्या स्वतः सहभागी होणार आहेत.
 
मुलुंड प्रकल्पग्रस्त पुनर्वसन घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी तक्रार दाखल केली होती. मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी, देवनार येथील ५०,००० लोकांचे स्थलांतर मुलुंड पूर्व केळकर कॉलेज जवळ करण्याच्या ठाकरे सरकार घोटाळ्याच्या विरोधात नवघर पूर्व पोलिस स्टेशन येथे सोमय्यांनी तक्रार दाखल केली.
 
२२ मार्च २०२२ रोजी ठाकरे सरकार व मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इक्बाल चहल यांनी भ्रष्ट पद्धतीने हा कॉन्ट्रॅक्ट चोरडिया बिल्डरला दिला. मुलुंड पूर्वची सद्याची लोकसंख्या १ लाख यात ५०,००० लोकांची भर होणार. यात २५,००० बांग्लादेशी असणार. महापालिकेच्या या घोटाळ्याविरूद्ध महापलिका अधिकारी, ठाकरे सरकारचे अधिकारी व ईस्ट पुणे रियालिटी एलएलपी या कंपनीचे चोरडिया यांच्या विरोधात आयपीसी कलम ४०६, ४०८, ४०९, १२०, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. अशी मागणी सोमय्यांनी केली होती.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0