मुंबई : गरीब मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबा शरद पवार आहेत. असा हल्लाबोल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर समाजही आरक्षणासाठी आग्रही झाला आहे. याच पार्श्वभुमीवर ट्विट करत पडळकरांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
ट्विट करत गोपीचंद पडळकर म्हणाले, "रोहित पवार तुमच्या माहिती करता स्वराज्याची स्थापना आठरापगड जातींनी केली. पण त्यावर घाव घालणारे सुर्याजी पिसाळ आणि गणोजी शिर्के होते आणि देवेंद्र फडणवीस यांनी गरीब मराठा समाजाला दिलेले आरक्षण घालवणारे आपले जातीयवादी आजोबाच शरद पवार आहेत." असं ट्विट करत गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये त्यांनी रोहित पवारांना टॅग केलं आहे.