रूरल मार्केटिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुनित विद्यार्थी

27 Nov 2023 21:07:29
Punit Vidyarthi news

मुंबई : ‘केस न्यू हॉलंडच्या रूरल मार्केटिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ (आरएमएआय) च्या अध्यक्षपदी पुनित विद्यार्थी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘आरएमएआय’च्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात पुनित विद्यार्थी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून ते मावळते अध्यक्ष विश्वंभर चक्रवर्ती यांच्याकडून कार्यभार स्वीकारतील.

पुनित विद्यार्थी हे केस न्यू हॉलंड येथे मार्केटिंग बिझनेस डेव्हलपमेंटचे प्रमुख असून बांधकाम उपकरणांच्या व्यवसायाचाही त्यांना अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचा कंपनीला चांगला उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर विद्यार्थी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “ ‘आरएमएआय’चे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आभार मानतो. ‘आरएमएआय’ अनेक दशकांपासून संपूर्ण भारतातील ग्रामीण मार्केटर्ससाठी एक महत्त्वाची उद्योग संस्था बनली असून तो ग्रामीण भारताचा नॉर्थ स्टार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


 
Powered By Sangraha 9.0