काँग्रेस अध्यक्षांच्या भाषणादरम्यान गोंधळ! खरगेंचा संयम सुटला, म्हणाले, "ऐकायचं असेल तर ऐका नाहीतर..."

26 Nov 2023 17:37:23

Mallikarjun Kharge


हैदराबाद :
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष प्रचाराच्या तयारीला लागले आहे. यातच तेलंगणात एका निवडणूक रॅलीला संबोधित करत असताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा संयम सुटला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
मल्लिकार्जून खर्गे तेलंगणामध्ये एका रॅलीला संबोधित करत असताना उपस्थित काही जणांनी गोंधळ केला. यावेळी ते संतापले आणि ऐकायचे असेल तर ऐका नाहीतर इथून निघून जा असे त्यांनी म्हटले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, "शांत राहा. ऐकायचे असेल तर ऐका, नाहीतर निघून जा."
 
ते पुढे म्हणाले, “तुम्हाला कळत नाही का? या बैठकीमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा एक नेता बोलत आहे. आणि तुम्ही तुमच्या तोंडात येईल ते बोलत आहात. ऐकायचे असेल तर ऐका, नाहीतर निघून जा," असे त्यांनी म्हटले आहे.
 
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सही करण्यात येत आहे. दरम्यान, तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तर ३ डिसेंबर रोजी सर्व विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे.



Powered By Sangraha 9.0