मुंबई : करोना काळानंतर दाक्षिणात्य चित्रपटांची जगभरात चांगलीच हवा झाली. त्यातही 'कांतारा' हा चित्रपटाने त्याचा असा वेगळाच प्रेक्षकवर्ग तयार केला. 'कांतारा' ची संकल्पना, विषय, कथा, अभिनय अशा अनेक गोष्टींची प्रचंड चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा कांताराच्या सर्व चाहत्यांना या चित्रपटाचा प्रिक्वेल लवकरच येणार असून या चित्रपटाची पहिली झलक २७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
'कांतारा' चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेने ऋषभ शेट्टी यांनी या चित्रपटासाठी भव्य सेट उभारण्याचे काम सुरु केले आहे. २७ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या मुहुर्त सोहळ्याला अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी, निर्माते विजय किरगंडूर आणि इतर कलाकार आणि क्रू सदस्य मुहूर्त पूजेला उपस्थित राहणार आहेत. या मुहूर्ताच्या पूजेनंतर निर्माते डिसेंबरमध्ये चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात करणार आहेत. दरम्यान, इफ्फी चित्रपट महोत्सवात ‘कांतारा’ चित्रपट दाखवला जाणार आहे.