मुंबई : अंतरवली सराटी दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी बेदरे कडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आलं आहे. अंतरवाली सराटीच्या घटनेनंतर ऋषिकेश बेदरेवर गोंदी पोलीस ठाण्यात कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचा शोध घेत असताना तो इतर २ साथीदारांसह आढळून आला. काल सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.
अंबड पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यानंतर त्याविरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला गेला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर त्यावेळी दगडफेक करण्यात आली होती.