बंगलोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाच्या स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानातून दि. २५ नोव्हेंबर २०२३, शनिवारी उड्डाण भरले. त्यांनी बंगलोर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या सुविधेला भेट दिली होती. या प्रवासाचा अनुभव शेअर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, "आज तेजसमध्ये उड्डाण करताना मी अभिमानाने सांगू शकतो की, आपला देश मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे स्वावलंबनाच्या क्षेत्रात जगात कोणाहीपेक्षा कमी नाही." या उड्डाणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी को-पायलटची भूमिका बजावली.
तेजस हे मेड-इन-इंडिया विमान आहे. भारत सरकारच्या मालकीचे कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने हे लढाऊ विमान बनवलेले. बंगलोर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या भेटीदरम्यान, पंतप्रधआन नरेंद्र मोदींनी तेजस उत्पादन सुविधा आणि इतर सुविधांचा आढावा घेतला आणि तेथे उपस्थित लोकांशी चर्चा केली.