प्रत्येक बौद्धिकातून नवीन काही तरी मिळाले

25 Nov 2023 17:30:39
Madhuji Joshi on Motibaug


वर्षांपूर्वी मोतीबागेत समोर दिसणारी, ती शेडही आम्हाला भारलेली जागा वाटायची. कारण, तेथेच आम्ही राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची, श्रद्धेय मोरोपंत, बाबाराव भिडे, डॉ. वि. रा. करंदीकर यांची बौद्धिके ऐकली आहेत. प्रत्येक बौद्धिकात नवीन काही तरी मिळे. बाबांचे बौद्धिक दर शुक्रवारी असे. त्यांचे प्रत्येक स्वयंसेवकावर बारीक लक्ष असे. काही प्रश्नोत्तरेही होत. त्याकाळी मोतीबागेत विनायक महाराज, श्रीकृष्ण भिडे, दामुअण्णा, पहिल्याच खोलीत बसणारे आबा अभ्यंकर यांच्या भेटी होत.
 
तसे तर आम्हा कार्यकर्त्यांची मोतीबाग सार्‍या शहरात पसरलेली असते. त्याच काळात अनेक नव्या उपक्रमांना सुरुवात झाली होती. त्याच्या हालचाली, नवे काही अनुभव हे श्रेष्ठींना वेळच्या वेळी कळविणे हे त्यावेळी फार महत्त्वाचे होते. आज आता मोतीबागेची पाच-सहा मजली इमारत झाली आहे, तरीही आमचे मन अजूनही त्या जुन्या शेडमधील बौद्धिकातून बाहेर येण्यास तयार नाही.

 
मधुजी जोशी
Powered By Sangraha 9.0