IFFI च्या रेड कार्पेटवर सिद्धार्थ जाधवचा दिग्गजांबरोबर झाला सन्मान

24 Nov 2023 16:58:58

iffi 
 
मुंबई : गोव्यात सध्या ‘इफ्फी’ म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली असून यात मराठी कलाकार आणि चित्रपटांचीच चांगलीच चर्चा सुरू आहे. या महोत्सवात ‘गांधी टॉक्स’ हा चित्रपट पहिल्यांदाच दाखवण्यात आला असून या चित्रपटात अरविंद स्वामी, विजय सेथुपती, अदिती राव हैदरी आणि मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, या चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर.रेहमान यांनी संगीत दिले आहे. तसेच, या ‘इफ्फी’त मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवची उपस्थिती आनंदाची बाब होती. शिवाय इतर दिग्गज कलाकारांसोबत इफ्फीच्या सोहळ्यात सिद्धार्थचा होणार सन्मान मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद होता.
 

siddharth jadhav 
 
अभिनेता सिद्धार्थ जाधवने पहिल्यांदाच इफ्फीला हजेर लावली होती. त्याचा खास अनुभव त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. सिद्धार्थ म्हणतो, “मी आयुष्यात पहिल्यांदाच इफ्फीला आलो. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आमचा ‘गांधी टॉक्स’ चित्रपट…आमच्या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग या सोहळ्यात करण्यात आलं. मला खरंच खूप जास्त आनंद झाला आहे. सगळ्या चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे खूप खूप आभार!”
Powered By Sangraha 9.0