गुगलने सुरु केला हिंदी चित्रपटांवरील ऑनलाइन प्रदर्शन, २१ संस्थांसोबत केली भागीदारी

24 Nov 2023 15:31:39

google
 
मुंबई : हिंदी चित्रपटांच्या इतिहासाचे डिजीटायझेशनसाठी आता गुगलने नवा उपक्रम सुरु केला आहे. गुगल आर्ट्स आणि कल्चर यांनी हिंदी चित्रपटांवरील आतापर्यंतचं सर्वात मोठं ऑनलाइन प्रदर्शन सुरू केले आहे. गुगल आर्ट्स अँड कल्चर प्लॅटफॉर्मवर जगभरातील चित्रपट रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश असणार असून यात १२० हून अधिक गोष्टी आणि ७००० हून अधिक आशयांच आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.
 
तसेच, या प्रदर्शनात ५००० फोटो आणि १५०० हून अधिक व्हिडिओ, पोस्टर्स, मंथन सारख्या जुन्या अभिजात चित्रपटांशी संबंधित गाणी ते आधुनिक गाण्यांचा देखील समावेश असणार आहे. नॅशनल फिल्म आर्काइव्ह ऑफ इंडिया, द म्युझियम ऑफ आर्ट अँड फोटोग्राफी आणि यशराज फिल्म्ससह २१ सांस्कृतिक संस्थांसोबत गुगल आर्ट्स आणि कल्चरच्या भागीदारीचा हा एक महत्वपुर्ण भाग आहे.
 
याबद्दल अधिक बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणतात, “चित्रपट आपल्याला एक समाज म्हणून एकत्र आणतो. ही कला आपल्याला एक समाज म्हणून परिभाषित करते. मला हे पाहून अतिशय आनंद होत आहे की, भारतातील आणि जगभरातील प्रेक्षकांसाठी सिनेमॅटिक अनुभवाचे कायमस्वरूपी आकर्षण आता उपलब्ध झाले असून त्याला एक ऑनलाइन विशेष व्यासपीठ प्राप्त झाले आहे. मी प्रत्येकाला इथे फिल्म बाजार आणि गुगल आर्ट्स अँड कल्चर प्लॅटफॉर्मवर या कलेच्या इतिहासाचा आनंद घेण्यासाठी येण्याचा आग्रह करतो”.
Powered By Sangraha 9.0