चीनवर लागलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे भारतीय सौर पॅनल बनवणाऱ्या उत्पादकांची चांदी

23 Nov 2023 18:45:16
 solar inverters
 
मुंबई : जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सौर उर्जेची मागणी वाढत आहे. याच वाढत्या मागणीचा फायदा घेत भारतीय उत्पादक सौर मॉड्यूल्सची जगातील प्रमुख देशांमध्ये निर्यात करत आहेत. भारतीय सौर मॉड्यूल्सची निर्यात भविष्यातही अशीच राहिल. कारण, सध्या जगभरात चीन अधिक-एक रणनीतीचा वापर केला जात आहे.
 
आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या सहामाहीत भारतातून सौर सेल आणि मॉड्यूल्सची निर्यात ८३०७ कोटी रुपये होती. जी गेल्या वर्षी याच कालावधीतील १,४५३ कोटी रुपयांच्या तुलनेत अनेक पटींनी वाढली आहे. देशांतर्गत उत्पादकांच्या आकडेवारीतही अशीच वाढ दिसून येते.
 
भारताचे सौर मॉड्यूलची निर्यात प्रामुख्याने अमेरिकेमध्ये होते. अमेरिका-चीनमध्ये सुरु असलेल्या व्यापारयुद्धामुळे चीनवर मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीय उद्योजकांना चांगली संधी निर्माण झाली आहे. भारतात सौर पॅनल बनवण्यात अदानी एंटरप्रायझेस, टाटा पॉवर इत्यादी कंपन्या आघाडीवर आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0