उत्तर मध्य रेल्वेत १० वी पास आणि ITI उमेदवारांना नोकरीची संधी; अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

22 Nov 2023 18:44:54
North Central Railway Recruitment 2023

मुंबई :
उत्तर मध्य रेल्वेत नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. उत्तर मध्य रेल्वेतील रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून १० वी पास आणि ITI उमेदवार या भरतीकरिता अर्ज करू शकतात. उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत होणाऱ्या भरतीच्या माध्यमातून 'प्रशिक्षणार्थी' या पदाच्या एकूण १,६९७ जागा भरल्या जाणार आहेत.

उत्तर मध्य रेल्वेमधील प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, या भरतीकरिता उमेदवारास अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून दि. १४ डिसेंबर २०२३ पूर्वी अर्ज करणे बंधनकारक असणार आहे. तर उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.

उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत अर्जदारांकडून अर्जशुल्क आकारण्यात येणार असून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (सामान्य/ओबीसी) १०० रुपये तर मागासवर्गीय (SC/ST/PWD/स्त्री) प्रवर्गाकडून अर्जशुल्क आकारले जाणार नाही. उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत होणाऱ्या भरतीविषयक तपशीलासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Powered By Sangraha 9.0