महापारेषण अंतर्गत १,९०३ पदांसाठी ‘या’ उमेदवारांना नोकरीची मोठी संधी! जाणून घ्या

    21-Nov-2023
Total Views |
mahatransco-recruitment-2023-maharashtra-state-electricity

मुंबई :
 'महापारेषण'अंतर्गत मोठी भरती केली जाणार असून महाराष्ट्र विद्युत महामंडळात नोकरी करु इच्छिणाऱ्यांना चांगली संधी मिळणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेडकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच, महापारेषणकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार 'विद्युत सहायक' या पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

महापारेषण अंतर्गत 'विद्युत सहायक' पदाच्या एकूण १,९०३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. महापारेषणकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार ३ वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटी पध्दतीने निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदभरतीसाठी दि. २० नोव्हेंबर २०२३ पासून अर्ज स्वीकृतीस सुरुवात झाली आहे. सदर अर्जप्रक्रिया दि. १० डिसेंबर २०२३ पर्यंत असणार आहे.

या भरतीकरिता उमेदवारांकडून अर्जशुल्क आकारले जाणार असून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच, उमेदवारास अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने करावयाचा असून अंतिम मुदतीआधी अर्ज करणे बंधनकारक असणार आहे. भरतीसंदर्भातील अधिक तपशील महापारेषणच्या अधिकृत वेबसाईटवर पाहा.